घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर विषयावर भव्य प्रदर्शन देशभरातील २८ कंपन्या सहभागी 

डोंबिवली  – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कचरा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकीकडे पालिका प्रशासन या समस्येवर जनजागृती करत असताना दुसरीकडे घनकच-याचे व्यवस्थापनावर ठिकठीकाणी प्रदर्शन भरविले जात आहे. कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महापालिका प्रस्तुत व युनीट्रॅक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पुनर्वापर विषयावर भरविलेल्या भव्य प्रदर्शनात देशभरातील २८ कंपन्या सहभाग घेतला होता.

    १ जून ते ३ जून असे तीन दिवस हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती. सुका आणि ओला कचरा  आणि संगणकीय कचरा (इ वेस्ट) असे कचर्याचे वर्गीकरण प्रत्येकाने स्वताच्या घरापासून कसे करावे. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करता येईल. घरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे जैविक खतात कसे रुपांतर करावे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत या प्रदर्शनात माहिती देण्यात आली. या प्रदर्शनात घनकचरा व्यवस्थापनसांडपाणी प्रक्रियासंगणकीय कचराआणि इंग्रजी मधील ४ आरच्या माध्यमातून कचर्याचा पुनर्वापर याची माहिती दिली जाणार आहे. या प्रक्रिया करणाऱ्या पुरवठा दाराकडून त्यांच्याकडील मशिनरीदेखील या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या मशिनरीद्वारे कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आपले घरआपली सोसायटी आणि आपला परिसर स्वछ ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या माहितीची देवाणघेवाणअद्ययावत यंत्र सामुग्रीबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न राहील. तरी या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देत स्वच्छ् शहरासाठी आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन आयोजक जितेंद्र पाटील यांनी केले आहे.स्वयपाकघरातील कचऱ्यापासून जैविक उउर्जा निर्माण करणाऱ्या महेलेम इंजिनियर्स प्रा. लि. कंपनीस गर्बेज गुरु अवोर्ड पंतप्रधान नरेद्र मोरी हस्ते देण्यात आला होता.या कंपनीचा स्टोल या प्रदर्शनात सहभागी झाली होती. तर कल्याणमधील मनुसृष्टी कंपनी असून  हर्षल तांबट हे पर्यावरण सल्लागार काम करतात. हि कंपनीही या प्रदर्शनात सहभागी झाली होती.  

 स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या पालिकेच्या बॅनरवर `धूळ`

        या प्रदर्शनात पालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता अभियानांतर्गत लावलेल्या स्टोलकडे नागरिकांनी पाठ दाखविल्याचे दिसले. विशेष स्वच्छता अभियानांच्या बॅनरला धूळ साचली होती या स्टोलवरील सामानहि स्वखर्चाने आणले असून पालिका घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य लक्ष देत नाही असे यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाच्या संचालिका रुपाली साईवाले यांनी सांगितले.  

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email