ग्रामीण भागातील शिधावाटप दुकानांवर ई पॉस मशीन्सद्वारे महिन्याभरात १ लाखांपेक्षा जास्त व्यवहार

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमात माहिती

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५९० ई पॉस मशीन्सचे वाटप शिधावाटप दुकानांना करण्यात आले असून फेब्रुवारी महिन्यात त्यांनी मिळून १ लाख १२ हजार व्यवहार या मशीन्सद्वारे केले आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी यांनी दिली. ते  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

ई पॉस मशीन्सचे वाटप दुकानदारांना केल्यापासून याद्वारे धान्य विक्री होत असून ग्राहकांना देखील याची सवय होत आहे असे ते म्हणाले. एकट्या फेब्रुवारी महिन्यात २० हजार क्विंटल तांदूळ, १० हजार ८३७ क्विंटल गहू आणि ३५८ क्विंटल साखरेची विक्री झाली.

भिवंडी तालुक्यात १५५ दुकानांना तर शहापूर मध्ये १६३, मुरबाड मध्ये १९६, कल्याण येथे ४२ आणि अंबरनाथ येथे ३० मशीन्स लावण्यात आली आहेत. एकंदर पाचही तालुके मिळून ७५.८२ टक्के शिधापत्रिका या आधारशी जोडण्यात आल्या आहेत.

पुरवठा विभागाने बायोमेट्रिकच्या माध्यमातून ग्राहकाला सेवा दिली असून रोखीने व्यवहार न करता  ऑनलाईन व्यवहार करणे शक्य आहे. एखाद्या ग्राहकाकडे एंड्राइड मोबाईल नसेल तर #99 दाबून यात ऑनलाईन पैसे देता येणे शक्य आहे अशी माहितीही देण्यात आली.

अन्न व औषधे प्रशासन सहायक आयुक्त माधुरी पवार म्हणाल्या की, मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्टचा परवाना दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. ग्राहकांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधी घेऊ नयेत. तक्रारी असल्यास १८००२२२३६५ या क्रमांकावर ग्राहकांनी संपर्क साधावा असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमास सहायक गटविकास अधिकारी व्ही आर चव्हाण, आन सुरक्षा अधिकारी दिवाकर कांबळे, वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी, ग्राहक संरक्षण समिती सदस्य ऊपस्थित होते. युवराज बांगर यांनी समारोप केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email