ग्रामस्थ पाठोपाठ शनिशिंगणापूरमध्ये आता कर्मचार्‍यांचे उपोषण सुरू

नगर – बेकायदा कर्मचारी भरती प्रकरणी उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी मंगळवारी दुपारी अचानक कामावरून कमी केले.

याप्रकरणी संतप्त १०६ कर्मचाऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

दरम्यान बुधवारी सकाळी उपोषणकर्त्यांची तहसीलदार उमेश पाटील यांनी भेट घेतली. देवस्थान प्रशासनाची चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

मात्र, कर्मचारी उपोषणावर ठाम आहेत.

गुरुवारपासून कुटुंबातील सदस्यांना उपोषणास घेऊन बसणार असल्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला.

काल विधानपरिषदेत विधेयक मंजूर करून शनी शिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात राहणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email