गोळवलीत पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सुटणार एमएसआरडीसी तर्फे पहाणी

नगरसेवक रमाकांत पाटील  यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश

कल्याण  डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १०९ गोळवलीत पावसाळ्यात ठीकठिकाणी पाणी साचते.येथील अंडर ग्राउंड ड्रेनेज लाईन आतून भरल्याने तसेच ड्रेनेज कमी आकाराचे असल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने सदर समस्या निर्माण होतेय.

ही समस्या सुटावी यासाठी भारतीय जनता पार्टी के नगरसेवक रमाकांत पाटील यांनी महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉरपोरेशनशी (msrdc) अनेकदा पत्रव्यवहार केला,पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला आता यश आले असून आज बुधवारी दुपारी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध बोरुडे यांनी कल्याण शीळ रोडची पहाणी केली.

यावेळी भाजपा नगरसेवक रमाकांत पाटील यांची भेट घेवुन त्यांनी त्यांच्या प्राभागातील समस्येची पहाणी केली व त्यांना सदर समस्या सोडावण्याचे आश्वासन दिले.
कल्याण शील रोड तेथील प्रभाग क्रमांक १०९ गोळवलीत जास्त पाऊस पडल्यास रहिवाशांच्या घरात पाणी शिरते,रस्त्याच्या दुसा-या कडेला असलेल्या अंडर ग्राउंड ड्रेनेज जाम झाल्याने तसेच त्याचा आकार कमी असल्याने पाण्याचा निचरा नित होत नसल्याने सदर समस्या निर्माण होत असल्याने ही समस्या सुटावी म्हणून एमएसआरडीसीकड़े नगरसेवक रमाकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता प्रसंगी आंदोलन करू असा इशाराही दिला होता.

आज एमएसआरटीसीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध बोरुडे यांनी भेट देवून पहाणी करुन ही समस्या पावसाळा येण्यापूर्वी सोडवण्याचे आश्वासन दिले.या पहाणी दौ-यादरम्यान एमएसआरटीसीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध बोरुडे यांच्याबरोबर प्रभाग क्रमांक १०९ गोळवलीचे नगरसेवक रमाकांत पाटील, भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी अव्हाड उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथील समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.एमएसआरटीसीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध बोरुडे यांनी पावसाळा येण्यापूर्वी सोडवण्याचे आश्वासन दिले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email