गोळवलीतील पाणीटंचाई सोडवण्यासाठी एम.आय.डी.सी.च्या अधिका-यांना घेराव
कल्याण डोंबिवली महानगरपालिच्या २७ गावातील अनधिकृत बांधकामांचे दुष्परिणाम आता त्रासदायक ठरू लागले आहेत.उन्हाळ्यातील उष्णतेने आपला प्रभाव दाखवायला सुरु करून आठवडाही झाला नाही तर २७ गावात पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.पाणी मिळत नसल्याने नागरिकांना फारच त्रास होत आहेत.पाणी मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत असल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १०९ चे भारतीय जनता पार्टीचे नगर सेवक रमाकांत पाटील यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जल अभियंता कुंभार याना बुधवारी सकाळी घेराव घातला.
नगरसेवक रमाकांत पाटील यांनी आपल्या प्रभागातिल समस्या सोडवण्यासाठी पालिका अधिका-यांना बरोबर घेवुन त्यांच्या समवेत एम.आय.डी.सी.च्या जल अभियंत्यांची भेट घेतली.तसेच प्राभाग क्रमांक ८६ च्या नगरसेविका सौ.सुनीता खंडागळे यादेखिल आपल्या प्रभागातिल नागरिकांच्या पाण्याची समस्या घेवुन सदर कार्यालयात आल्या होत्या.नगरसेवक रमाकांत पाटील व नगरसेविका सौ.सुनीता खंडागळे आपल्या प्रभागातिल पाणी समस्या सुटावी यासाठी यावेळी तब्बल ४ तास जल अभियंता कुंभार यांच्या कार्यालयात ठाणं मांडून बसले. नगरसेवक रमाकांत पाटील यांच्यासह पालिकेचे जल अभियंता फाटक,विजय पाटिल व मोरे हे देखील एम.आय.डी.सी. कार्यालयात बसून होते.तसेच पाणी मिळत नसल्याने त्रासलेले अनेक नागरिकही पाटील यांच्यासह आले होते.
कल्याण डोंबवली महापालिकेतील २७ गावात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामें होत आहेत.कल्याण डोंबिवली महानगर पालिका व एम.आय.डी.सी. द्वारा येथे २७ गावाना दिले जाणारे पाणी सिमित आहे.उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त पड़त असल्याने व देण्यात येणारे पाणी तेवढेच असल्याने ही समस्या निर्माण होत आहे.१० ते १५ वर्षांपूर्वी येथे अशी अवस्था नव्हती २४ तास पाणी प्रेशरने येत असे परंतु नंतर येथे अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढल्याने हा त्रास उद्भवू लागला आहे.सदर बांधकामे सुनियोजित पद्धतीने झाली असती तर अशी समस्या निर्माण झली नसली असे येथील रहिवाशांनी सांगितले.आज कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे प्रेशर वाढवुन ही समस्या सोडवण्याचे आश्वासन अभियंता कुंभार यांनी दिले.