गोळवलीतील ग्रामदेवतेची पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न
गोळवलीतील ग्रामदेवतेचा उत्सव उत्साहात
डोंबिवली – दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही डोंबिवलीतील गोलवली गावातील ग्राम देवतेची पालकी मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली गावातील तरुण मित्र मंडळींनी तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला मंडळ यांनी ही पालखी मिरवणुकीत सहभागी होऊन परंपरा जोपासण्याचा चांगलाच मानस पूर्ण केला.
या एकता मित्र मंडळाचे संस्थापक श्री. अरुणशेठ रामचंद्र भोईर यांचे मार्गदर्शन तसेच युवाध्यक्ष कूमार विराज अरुणशेठ भोईर यांनी मोलाची भर देऊन हा उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडून गावातील एकोपा साधण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे.याकामी त्यांचे सहकारी मित्र जयेश पाटील, अमित म्हात्रे ,आकाश भोईर ,मनिष म्हात्रे ,प्रवीण केणे, सोनू गायकर तसेच गावातील इतर मंडळींनी ही चांगलीच साथ दिली व एकत्र येऊन देवीचा पालखी सोहळा उत्साहात व आनंदात पार पाडण्यास मदत केली.
Please follow and like us: