गोरेगाव स्थानकापर्यंत हार्बर लाईनचा विस्तार पूर्ण ; आज संध्याकाळी लोकार्पण

गोरेगाव स्थानकापर्यंत हार्बर लाईनचा विस्तार पूर्ण झाला असून, आजपासून गोरेगावपर्यंत हार्बर लोकल सुरू होणार आहे. या मार्गाचे उद्धाटन पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी गोरेगाव स्थानकावर होईल. या मार्गासाठी ३१६ कोटींचा खर्च करण्यात आले असून, हजारो प्रवाशांना या लोकलचा फायदा होणार आहे. त्याचसोबत सीएसएमटी, डॉकयार्ड रोड, ठाणे, लोणावळा स्थानकातील नवीन सरकते जीने, बोरिवली, दादर(पश्चिम), डॉकयार्ड रोड, वडाळा रोड, चेंबूर, लोणावळा स्थानकातील लिफ्टचेही आज उद्घाटन करण्यात येणार आहे

दरम्यान, चुनाभट्टी स्थानक पादचारी पूल आणि विरार येथील विस्तारित पादचारी पुलाचे ही उद्घाटन, पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकावर लावण्यात आलेल्या एलईडी लाइट्स, पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर आणि सांताक्रूझ स्थानकात लावण्यात आलेल्या सोलार पॅनलचेही आज लोकार्पण करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा ढळढळीत नमुना

रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा ढळढळीत नमुना पुन्हा एकदा जगसमोर आलाय. गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आलाय. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी गोरेगाव स्थानकात लोकार्पण होणार आहे. पण यानिमित्तानं छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे दिवंगत आमदार प्रकाश सावंत यांचं नाव निमंत्रितांच्या यादीत छापण्यात आलंय. प्रकाश सावंत यांचं निधन झालं त्याला आता जवळपास तीन वर्ष उलटली आहेत. त्यानंतर त्यांच्या मतदार संघात पोटनिवडणूक होऊन त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांचं नाव मात्र या यादीत नाही. 

Please follow and like us:
Pin Share

Hits: 15

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email