गॅॅस भरण्याच्या नावाने पैसे घेवून चालक पसार
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमकडील सुदाम म्हात्रे इमारती मध्ये राहणारे लक्ष्मी अग्रवाल यांच्या मालकीची चारचाकी गाडी आहे .काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीचा चालक अजय शेट्टी याने त्यांच्याकडे पेट्रोल गॅॅस भरण्याचा बहाणा करत अग्रवाल यांच्याकडून एक हजार रुपये घेतले. त्यानंतर शेट्टी एक हजार रुपये व गाडीमधील मोबाईल घेवून पसार झाला .बराच वेळ वाट पाहून हि तो न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी दीपक शेट्टी या चालका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
Please follow and like us: