गुहागर आणि देवरूख मध्ये सरासरी 78 टक्के मतदान

म विजय
मुंबई, दि. 11: गुहागर व देवरूख (जि. रत्नागिरी) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 77.91 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; तसेच कणकवली (जि. सिंधुदुर्ग) नगरपंचायतीच्या आणि जामनेर (जि. जळगाव) नगरपरिषदेच्या प्रत्येक एका प्रभागात अनुक्रमे 79.41 व 68.17 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, गुहागर आणि देवरूख नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी 17 आणि अध्यक्षपदाच्या जागांसाठी ही निवडणूक झाली. गुहागरमध्ये 81.72, तर देवरुखमध्ये 75.65 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्र.10 आणि जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.7 मधील सदस्य आणि अध्यक्षपदासाठीदेखील आज मतदान झाले. या दोन्ही ठिकाणच्या इतर प्रभागातील मतदान 6 एप्रिल 2018 रोजी पार पडले होते. त्याचबरोबर आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत आणि वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध ठिकाणच्या 7 रिक्तपदांकरितादेखील 6 एप्रिल 2018 रोजी मतदान झाले होते. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 12) मतमोजणी होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email