गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश….

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – येथील शिवाई बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी  काढलेल्या शोभायात्रेत स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी सोनारपाडा , दावडी आणि आजदे येथील जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांसाठी `निरोगी आरोग्य` या विषयावर  निबंध स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करणार नाही, कुटुंबातील आणि परिसरातील नागरिकांना याचे महत्व समजावून सांगू अशी शपथ घेतली. यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून आजदेगावचे नगरसेवक विनोद काळण, नगरसेविका पूजा म्हात्रे, युवा सेनेचे पदाधिकारी योगेश म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.  निबंध स्पर्धेत सोनारपाडा येथील जानव्ही नितीन म्हात्रे, आकाश भिकाजी शिंदे, दावडी गावतील गायत्री दुर्गा सिंग, रोहित सुभाष कोळी, काजल छैबर यादव, आणि आजदे येथील आरती संजय नरवाडे, सलोनी अमरदास निमोरे, जया  समाधान गवळी तर वक्तृत्व स्पर्धेत सोनारपाडा येथील दिव्या वैश्यम ठाकूर, नेहा नरेंद्र शाह, आपुलकी प्रकाश शेळके, दावडी येथील पायल गौतम , तेजस आधार ननावरे, आणि आजदे येथील आरती संजय नरवाडे, जया समाधान गवळी या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email