गाळ्याचे आमिष दाखवत 12 लाख 82 हजाराना गंडवले
डोंबिवली – नवी मुंबई कामोठे येथे राहणारे सुरेंद्र यादव याना डोंबिवली मध्ये राहणा-या दिनेश कुमार सिंग या इसमाने गाळा विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवत 2014 सालापासून आजमितीला तब्बल 12 लाख 82 हजार पाचशे रुपये उकळले .पैसे दिल्यानंतर ही या गाळ्याचा प्रत्यक्ष ताबा न देता सिंग याने त्यांना उडवा उडवी ची उत्तरे दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने यादव यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी दिनेश कुमार सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे
Please follow and like us: