गाळा मालकाने केली भाडेकरूची फसवणूक

कल्याण – भाडेकरूचे सामान परस्पर दुकानाबाहेर काढून त्याचे डीपोझीट भाडेकरूला न दिल्याने या प्रकरणी सबंधित भाडेकरुनने गाळा मालकाविरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गाळा मालक राजेश जाधव व जितु जगताप विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील मानपाडारोड रिजेन्सी इस्टेट येथे राहणाऱ्या महिलेचे कल्याण पूर्वेकडील काटेमानवली नाका येथे आई थाळी नावाने हॉटेल आहे ,या हॉटेलसाठी गाळा राजेश जाधव यांच्याकडून भाडेकरारा करून  भाड्याने घेण्यात आला होता  .मात्र गेल्या शुक्रवारी राजेश जाधव व त्याच्या साथीदाराने भाडेकराराचा भंग करत या गाळ्याचे लोक तोडून गाळ्यातील उपहारगृहाचे सामान बाहेर काढले  तसेच  सदर महिलेने गाळ्या साठी दिलेले १ लाख डीपोझीट हि बळकावले .या प्रकरणी सदर महिलेने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गाळा मालक राजेश जाधव व जितु जगताप विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email