गाळा देण्याचे आमिष दाखवत बिल्डरने घातला लाखोंचा गंडा

(श्रीराम कांदु)
कल्याण – दोन गाळे विकत देण्याचे आमिष दाखवून एका प्रसिद्ध बिल्डरने एका इसमाला तब्बल 28 लाख २ हजार ७४८ रुपयांना गंडवल्याची घटना उजेडात आली आहे या प्रकरणी फसवणूक झालेल्या प्रशांत म्हात्रे यांनी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी निर्मल लाईफ स्टाईल ग्रुप चे धर्मेश जैन ,पूजा जैन ,राजीव जैन विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
ठाणे घोडबंदर रोड येथे राहणारे प्रशांत म्हात्रे यांना कल्याण मध्ये सल्ला सेवा केंद्र सुरु करायचे असल्याने ते या भागात गाळ्याच्या शोधात होते ,२०१४ मध्ये एका ओळखीच्या मित्राने त्यांना वडवली येथील निर्मल लाईफ स्टाईल यांच्या लाईफ सिटी येथे सुरु असलेला प्रकल्प सुचवला .म्हात्रे यांनी सदर ठिकणी जावून गाळा बघितला त्यांनी या गाळ्या साठी 28 लाख2 हजार ७४८ रुपये देवू केले मात्र पैसे देवून दोन वर्ष उलटली मात्र गळ्याचा ताबा मिळत नसल्याने त्यांना संशय आला त्यांनी शहानिशा केली असता निर्मल लाईफ स्टाईल ग्रुप चे धर्मेश जैन ,पूजा जैन ,राजीव जैन यांनी ए बिल्डींगच्या 2 गाळ्यांचा उल्लेख परवानगी नकाशामध्ये `नसून वस्तुस्थिती सदर  तळमजला सील असल्याचे समोर आले .त्यामुळे हि वस्तुस्थिती असतांना देखील बिल्डर ने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी काल या प्रकरणी निर्मल लाईफ स्टाईल ग्रुप चे धर्मेश जैन ,पूजा जैन ,राजीव जैन या तिघा विरोधात खडकपडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email