गार्डियन स्कूलमधील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत निवड

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – नुकतेच नाशिक येथे महाराष्ट्र राज्य साॅफ्टबॉल असोसिएशन व महाराष्ट्र राज्य पोनी साॅफ्टबॉल असोसिएशनची ८ वी पोनी सब-ज्यूनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा पार पडली.  या स्पर्धेत डोंबिवलीतील गार्डियन स्कूल आयसीएसई या शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. अक्षय सदाशिव , भार्गव धोंडे, मुकुल चौधरी, ईशान चैनी, पार्श इनामदार, श्रीहरी प्रसाद, ओमकार ढेंगे , समर्थ भोसले, अमोग आचार्य, अश्विन शेट्टी, कौशल भंडारी, श्रावणी म्हात्रे, श्रावणी सगरे, रुचा धाणी,सिधानी किनन्नुर, सई जाधव, नाईशा पुथरन, टिया अजित, मधुमिता नाडार अशी खेळांडूची नावे आहेत. साॅफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया व पोनी साॅफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाची ८ वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आरमोर ( निजामपूर ) तेलंगणा येथे ०३ ते ०५ मी २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील १२ वर्षाखालील  मुला- मुलींचा  संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र संघात गार्डियन स्कूलचे विद्यार्थी अक्षय सदाशिव,  श्रावणी म्हात्रे, श्रावणी सगरे, सिद्धानी किनन्नुर यांची निवड झाली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email