गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या विविध भावमुद्रा…जहांगीर कलादालन येथे प्रदर्शन

जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या विविध भावमुद्रा…हे प्रदर्शनजहांगीर कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे.
किशोरी आमोणकर यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या मातोश्री गानतपस्वनी मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे झाले. मोगूबाईंचे शिक्षण अल्लादियाँ खाँ साहेबांकडे झाले होते. घराण्याचे गाणे शिकत असताना त्यात किशोरी आमोणकर यांनी प्रयोगशीलता आणली. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे, असे त्या म्हणायच्या. त्या सतत संगीतावर चिंतन मनन करत असायच्या. गाण्यामध्ये रस महत्त्वाचा असतो, असे त्या सांगायच्या. साहित्यशास्त्रात रससिद्धांत वापरला जातो. हा सिद्धांत संगीतासाठीही पोषक असल्याचे त्यांचे म्हणणे होते. माणिक भिडे, सुहासिनी मुळगावकर, पं. रघुनंदन पणशीकर अशा दिग्गजांनी त्यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले. भारताचे प्राचीन संगीत परंपरेचा वेध घेण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. हे तत्त्व आजच्या काळात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड होती.आजही किशोरी आमोणकर यांचे गायन श्रोत्यांच्या मनात घर करुन आहे.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या विविध भावमुद्रा…हे प्रदर्शन ५ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत जहांगीर कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे.

Please follow and like us:
Pin Share

Hits: 11

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email