गाडी बाजूस काढण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला गाडीत कोंबून केली मारहाण
कल्याण – भर रस्त्यात उभी असलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने चार जणानी वाहतूक पोलिसाला गाडीत कोंबून मारहाण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्व काटइ नाका ते बदलापूर रोड येथे घडली .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात किरण पाटील ,दिनेश म्हात्रे ,पप्पू व त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहर वाहतूक विभाग कोळसेवाडी युनिट चे पोलीस नाईक पिंटू चोरमले व ट्राफिक वार्डन संतोष पवार हे काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास काटइ नाका ते सोफ्ट टोइज दुकान कनका हॉटेल पुढे बदलापूर रोडवर वाहतूक नियोजनाचे काम करत होते .यावेळी भर रस्त्यात एक पिक अप गाडी उभी होती पवार याने गाडी चालकास गाडी पुढे घेण्यास सांगितले मात्र गाडीचालाकाने पवारना धक्काबुक्की करत वाद घालू लागला त्यामुळे पोलीस नाईक चोरमले यांनी त्या ठिकाणी धाव घेत चालकाला गाडी पुढे घेण्यास सांगितले मात्र त्यामुळे संतापलेल्या चालकाने चोरमले यांना शिवीगाळ सुरु करत या चालकाच्या साथीदाराने शेजारी उभ्या असलेल्या गाडीत चोरमले यांना कोंबून ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली .या प्रकरणी चोरमले यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी किरण पाटील ,दिनेश म्हात्रे ,पप्पू व त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .