गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना दाम्पत्याने केली मारहाण
कल्याण दि.२२ – वाहतूक अडथळा ठरणाऱ्या गाडीला बाजूला घेण्यास सांगितल्याने संतापलेल्या दाम्पत्याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण धमकी दिल्याची घटना कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात राज चौधरी व सई चौधरी असे या दाम्पत्याचे नाव आहे.
खडकपाडा पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई योगिता सुरडकर,पोलीस हवालदार पडवळे ,व गीते गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वसंत व्हॅली भागात गस्त घालत असताना एक गाडी भर रस्त्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असा पद्धतीने उभी केलेली दिसली. त्यामुळे योगिता यांनी गाडी मालक राज चौधरी व सई चौधरी यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले
त्यामुळे संतापलेल्या सई चौधरी यांनी योगिता याना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच यावेळी योगिता यांच्या मदतीसाठी आलेल्या पडवळे याना देखील सई यांनी मारहाण केली तर राज चौधरी यांनी पोलीस कर्मचारी गीते याना मारहाण केली. योगिता यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी राज चौधरी व सई चौधरी या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .