गाडीचे टायर चोरले मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कल्याण- कल्याण डोंबिवलीत भुरट्या चोरट्याचा जाच दिवसा गणिक वाढत असून आता हे चोरटे गाड्याचे टायर हि चोरू लागले आहेत .कल्याण पूर्वेकडील पिसवली येथील अमरदीप कॉलनी मध्ये राहणारे अविनाश आपटेकर यांच्या मेव्हण्याची गाडी त्यांनी काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आपल्या घराबाहेर उभी केली होती अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास या गाडीचे रिंग सकट दोन टायर चोरून नेले सकाळी हि बाब निदर्शनास आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: