“गांधीजींचे विचार आणि स्वच्छता” विषयावर वर्ध्यात चर्चासत्राचे आयोजन
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने महाराष्ट्रातल्या वर्धा येथे एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. हे चर्चासत्र “गांधीजींची विचारधारा आणि स्वच्छता” आणि या विचारधारेची स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत अंमलबजावणी या विषयावर केंद्रीत होते.
या चर्चासत्रात ग्रामीण स्वच्छता, सेंद्रीय कचरा व्यवस्थापन आणि ‘नई तालीम’शी निगडीत प्रतिबंधात्मक स्वच्छता या गांधीजींच्या स्वच्छ एवम् स्वावलंबी संकुल आदी संकल्पनांवर चर्चा झाली. चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या सत्रात केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी परराष्ट्र मंत्रालयाने विकसित केलेल्या आणि 124 देशांचा सहभाग असणाऱ्या “वैष्णव जन ते तेने कहिए” या गांधीजींच्या आवडत्या भजनाची आंतरराष्ट्रीय सांगितिक आवृत्ती सादर केली. गांधीजींचे वास्तव्य असलेल्या सेवाग्रामलाही सहभागी असलेल्यांनी भेट दिली.
महात्मा गांधी आधुनिक काळातले स्वच्छता आणि आरोग्य या विचारांचे सर्वात खंदे पुरस्कर्ते होते. उघड्यावर प्रातर्विधी करण्याबाबत होणारी मानखंडना आणि अस्वच्छ स्थितीत जगणं हे महात्माजींनी जाणले होतेच, पण यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हासही समजून घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्माजींच्या सुरक्षित स्वच्छता सवयींबाबतच्या गांधीजींच्या या तत्वज्ञानावर आधारित स्वच्छता मोहीम ही देशाच्या विकासाच्या कार्यक्रमाच्या अग्रभागी ठेऊन 2014 मध्ये स्वच्छ भारत मोहिमेचा प्रारंभ केला. आज स्वच्छ भारत मोहीम जन आंदोलन बनली असून, ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीत 2014 मधल्या 39 टक्क्यांवरुन 95 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. 5 लाख 15 हजार खेड्यात 8 कोटी 7 लाख शौचालये बांधण्यात आली असून, 530 जिल्हे आणि 25 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश उघड्यावर शौचमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महासंचालक (विशेष प्रकल्प) अक्षय राऊत, अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोपाळ तसेच सोहन पंड्या, डॉ. टी. करुणाकरन, प्रिती जोशी आणि कनकभाई गांधी हे गांधी तत्वज्ञान विषयक ज्येष्ठ विचारवंत या चर्चासत्राला उपस्थित होते.