गस्ती दरम्यान पोलीस शिपायाला मारहाण

कल्याण : सकाळच्या सुमारास गस्ती घालनार्या पोलीस कर्मचार्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सतीश उर्फ गोत्या सुनील लष्करे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्याण नजीक असलेल्या मोहने आंबिवली लहूजी नगर झोपडपट्टी परिसरात खडकपाडा पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई मोहंडूळे व विनोद तवर हे दोघे काल सकाळी साडे सात च्या सुमारास गस्ती घालत होते. यावेळी त्यांना सतीश उर्फ गोट्या सुनील लष्करे २७ हा इसम संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्यामुळे पोलीस शिपाई मोहंडूळे व विनोद तवर या दोघांनी त्याला हटकले व त्याची चौकशी सुरु केली त्यामुळे संतापलेल्या सतीश याने त्या दोघांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करन्यास सुरुवात केली. तसेच धमकी देत त्यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारि नुसार पोलिसांनी सतीश उर्फ गोट्या सुनील लष्करे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email