गर्भवती महिलेने बलात्कारानंतर स्वतःस पेटवून घेतले

बीड – प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेवर गावातीलच नराधमाने बलात्कार केल्याने अत्याचार सहन न झाल्याने सदरील विवाहित महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची दुर्दैवी घटना सिरस पारगाव येथे घडली.

सदरील महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असुन त्या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सिरस पारगाव येथील एका विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. दि.४ रोजी आरोपी विष्णु तुकाराम नवले हा रात्री अंधाराचा फायदा घेत घरात घुसून महिलेवर जबरदस्ती केली.

या प्रकरणाने प्रचंड मानसिक तणावात असलेल्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. यामध्ये महिला ७६ टक्के जळाली असुन सदरील महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी तहसिलदार व पोलिसासमोर महिलेने जबाब दिला असुन आरोपी विरोधात कलम ३७६ व ऍट्रासिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी विष्णु नवले यास काल रात्री ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

प्रसुतीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन नराधम आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी जनसामान्यांतून होत आहे.

sources – ABI News

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email