गरीब रथ एक्सप्रेसमधे झालेल्या अपघाताचा प्राथमिक अहवाल,शीतकरण उपकरणामुळे विजेचा धक्का

26 मार्च रोजी एक प्रवासी दगावला तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला होता

 दिल्ली-सरई-रोहिला-वांद्रे टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस रेल्वेमधे अजमेर रेल्वे स्थानकावर 26 मार्च 2018 रोजी दुपारी 4 वा. 35 मिनिटांनी झालेल्या अपघाताची वैधानिक चौकशी पश्चिम परिमंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. या अपघातात एक प्रवासी दगावला होता तर एक प्रवासी किरकोळ जखमी झाला होता.या रेल्वे गाडीतील मिनी पॅंट्रीमध्ये असलेल्या शीतकरण उपकरणामुळे विजेचा धक्का लागून हा अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात निष्पन्न झाले. उपकरणातील बिघाडामुळे हा अपघात झाला. हे निष्कर्ष सरकारच्या विचाराधीन आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email