‘खेकड्याचे रक्त’ विकण्याचे आमिष दाखवुन फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

 (म.विजय)

ठाणे – यु के मधिल केन्ट फर्मासुटिकल्स लिमिटेड कंपनीला औषध बनवण्या करिता ‘खेकड्याचे निळे रक्त , हत्तीचे वीर्य , जंगली फूड , नायजेरियन नट्स’ आवश्यक असल्याची माहीती इमेलवर पाठवुन लोकांना फसवणा-या तीन इसमांना ठाणे क्राईम ब्रांच यूनिट एक ने अटक केली आहे.

निनाद सारीपुत्र तेलगोटे राहणार ऊल्हासनगर यांना त्यांच्या ईमेल वर मेल पाठवुन या व्यवसायात चांगला फायदा होईल असे सांगुन त्यांना 3,66,000 रुपये बँकेत ट्रान्सफर करण्यास भाग पाडुन त्यांची फसवणूक करण्यात आली होती , त्या बद्दलची तक्रार ठाणे क्राईम ब्रांच कडे आली होती त्या प्रमाणे कळवा पोलीस स्टेशन मध्ये 420,467,468,120(B) , 34 सह गुन्हा दाखल करण्यात आला होती , त्याचा तपास करताना अब्दुल कादीर इब्राहिम कच्छी वय 40 राहणार पनवेल या इसमाला अटक केली , त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने त्याच्या बरोबर अजुन दोन नायजेरियन साथीदार असल्याचे सांगीतले त्याप्रमाणे दुसरा एजजोकु जोएल संडे वय 41 व तिसरा ओनकांची अँथोनी मडु वय 40 या नायजेरियन ईसमाना कोपरखैरने नवी मुंबई येथुन अटक करण्यात आली , या आरोपींकडून एकूण 37 मोबाईल फोन , 21 डेबिट कार्ड , वेगवेगळ्या बँकेची एकूण 28 चेक बुक , 47 देशी विदेशी मनगटी घड्याळ तसेच एजजोकी जोएल संडे याचा नायजेरियन देशाचा पासपोर्ट असा एकूण 3,60,320 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला , ह्या तिन ही आरोपींनी लोकांना फसवण्यासाठी नवीनच युक्ती काढली होती मुळात खेकड्याला रक्तचं नसत ,तरी लोक फसली जातात हे मोठ नवल आहे , हे आरोपी प्रथम ऑनलाईन फेसबुक वरून लोकांशी ओळख वाड्वत नंतर त्यांना अशा प्रकारचे खेकड्याचे निळे रक्त हवे आहे का असा मेल पाठवत , त्यांच्या संपर्कात असलेली लोक हा मेल वाचुन आपल्यासाठी हा निरर्थक असल्यामुळे वाचुन सोडुन देत असत , त्या नंतर हेच आरोपी एक दोन महिन्याने वेगळ्या फेसबुक अकाउंट मधुन आपल्याला अशा वस्तु पाहीजे असल्याचा मेल टाकत अगोदरचा मेल माहीत असलेल्या व्यक्ती पहिल्या पाठवलेल्या व्यक्तींशी संपर्क करून व्यवहार ठरवत वस्तु देणारे व घेणारे हेच़ आरोपी असल्यामुळे विक्री आणी खरेदी मध्ये मोठी तफावत ठेवत असत , व त्यांच्या कडुन मोठी रक्कम अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून घेत असत , त्यामुळे त्यांच्या जाळ्यात असे बरेच लोक अडकले असण्याची दाट शक्यता आहे असे पोलीस सह आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगीतले , नंतर मिळणारी रक्कम चाळीस टक्के आरोपी अब्दुल कच्छी घेत असे साठ टक्के रक्कम हे दोन नायजेरियन घेत असत , अशा प्रकारे त्यांनी बऱ्याच लोकांना फसवून बरीच मोठी रक्कम लाट्ल्याचि शक्यता आहे , पोलिसांचे लोकांना आव्हान आहे , जर अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे क्राईम ब्रांचशी संपर्क साधावा .व कोणीही अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेऊन फसू नये .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email