खासगी रुग्णालयांबरोबर आरोग्य मंत्रालयाचा नवीन उपक्रम एनएबीएच आरोग्य आणि स्वच्छतेचे कायाकल्प निकष स्विकारणार
नवी दिल्ली, दि.२० – रुग्णालय आणि आरोग्य सेवा पुरवठादारांच्या राष्ट्रीय प्रमाणन मंडळाने कायाकल्प योजनेच्या निकषांच्या धर्तीवर खासगी क्षेत्रात आरोग्य सेवा सुविधांच्या मूल्यमापनाबाबत विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशभरात सुरु असलेल्या “स्वच्छता ही सेवा” अभियानाचा हा एक भाग आहे. रुग्णालयातील स्वच्छतेमुळे संक्रमण रोखण्यात मदत होतेच शिवाय रुग्णांना आणि अभ्यागतांना सकारात्मक अनुभव येतो. रुग्णांच्या त्वरित देखभालीसह तिथल्या स्वच्छ वातावरणामुळे त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होते आणि त्यांना समाधानही मिळते. या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2015 मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत “कायाकल्प” योजना सुरु केली.
Please follow and like us: