खारघर येथे ‘पर्यावरण कार्यशाळा’ संपन्न

जोवर नदी काठ सक्रीय आहेत, तो पर्यंत नदी वाहते आहे;दिग्दर्शक  संदीप सावंत

खारघर येथे आयोजित ‘पर्यावरण कार्यशाळा’ येथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले, ‘नदी वाहते’ ह्या मराठी सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक  संदीप सावंत हे उपस्थिताना संबोधित करताना म्हणाले कि, जोवर नदी काठ सक्रीय आहेत, तो पर्यंत नदी वाहते आहे.‘श्वास’ ह्या लोकप्रिय सिनेमानंतर तब्बल १० वर्षांचा वेळ घेऊन ‘नदी वाहते’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया, त्या संबंधी केलेला अभ्यास,चित्रीकरणाच्या वेळेसचा अनुभव इ. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. दि. 1 मे रोजी आयोजित या पर्यावरण कार्यशाळेत मुंबई ते गोवा भागातील उपस्थीत विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि विदयार्थ्यांच्या प्रश्नास उत्तरे दिली.

विकासार्थ विद्यार्थी, कोंकण प्रदेश कडून ह्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नर्मदा स्वच्छता अभियानचे सचिन दवे (भोपाळ) ह्यांनी नर्मदा अभियानातील विविध टप्पे, लोकसहभाग, प्रशासनाचे सहकार्य आणि ह्या अभियान अंतर्गत मध्यप्रदेश मधील जनजागृती यावर मार्गदर्शन केले. विकासार्थ विद्यार्थीच्या माध्यमातून देशभरात चालणारे उपक्रम विविध विकासकामे ह्याबद्दल माहिती दिली.

पर्यावरण दक्षता मंच च्या श्रीमती संगीता जोशी ह्यांनी ‘पर्यावरण आणि आपण’ ह्या विषयावर संवाद साधला. पर्यावरण, आपली जबाबदारी, आपले कर्त्यव्य ह्या संबंधी खुमासदार शैलीत विद्यार्थांना बोलते केले. पर्यावरण दक्षता मंचाचे वनसंवर्धन आणि उर्जा बचत विषयातील ठाणे जिल्ह्यातील उपक्रम विद्यार्थांसमोर मांडले. आंबेजोगाई येथे पाणी फौंडेशन अंतर्गत Water Cup स्पर्धेतील त्यांचा दोन दिवसीय सहभाग आणि तेथील विशेष अनुभव ह्याबद्दल सांगितले.

ह्या कार्यशाळेअंतर्गत प्रत्यक्ष प्रकल्प भेटीचे आयोजन केले होते. पनवेल जवळील देहरंग गावात गेले २५ वर्ष तेथील वनवासी बांधवांसाठी ‘सत्कर्म साद्धाश्रय’ च्या माध्ममातून चालणारे उपक्रम आणि प्रकल्प दर्शन ह्या संबंधी सर्व विध्यार्थी ह्यांनी माहिती घेतली.

कोंकण प्रांतात आतापर्यंत झालेले विविध उपक्रम, विद्यर्थी सहभाग ह्या बद्दल माहिती सांगून विकासार्थ विद्यार्थी कार्याची आगामी दिशा, नवीन योजना या बद्दल कोकण प्रांत SFD प्रमुख मिहिर देसाई ह्यांनी संबोधित केले. ह्या ह्यावेळी सादर करण्यात आलेल्या गीताच्य ‘स्वार्थ साधना कि आंधी मे, वसुधा का कल्याण न भुले..’ ह्या ओळी आजच्या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आणि भावना उलगद व्यक्त करतात असे सांगून विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आपल्या संवेदना कायम जागृत राहतील ह्या साठी सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतला पाहिजे असे मिहिर देसाई याने सांगितले. अभाविप कोंकण प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ, मध्यप्रदेश येथे सामाजिक काम करणारे  बाहेती हे उपस्थित होते.

विविध महापालिकांत कळीचा मुद्दा झालेला कचरा प्रश्न आणि सध्या पाणी विषयांत महाराष्ट्रात चालू असलेल्या सामजिक उपक्रमात सक्रीय सहभागी होऊ असा निर्धार ह्या वेळेस मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, गोवा येथील उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email