खाण्यालायक बर्फ ओळखण्यासाठी बर्फ़ाला विशिष्ठ रंग देण्यात यावा -डॉ. शरद गुरव

डोंबिवली – पावसाळा नुकताच सुरू झाला असून या काळात अनारोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असते.त्यासाठी रस्त्यावरील अन्नपदार्थ टाळा. सर्वातमहत्वाचे म्हणजे विविध शीतपेयातून दिला जाणारा बर्फ हा खाण्याजोगा आहे का याची खात्री करूनच अश्या अन्नपदार्थांचे सेवन करावे अन्यथा यामधील गोठलेल्या जीवाणूंमुळे कावीळ, गॅस्ट्रो यासारखे आजार बळावतात. बर्फामधील आठ्ल्णाऱ्या जीवाणूंचे शिकार होऊ शकतो.यासाठी खाद्दयलायक बर्फ ओळखू येण्यासाठी त्याला विशिष्ट रंग देण्यात यावा अशी सूचना डॉ.शरद गुरव यांनी डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात केली. या प्रसंगी त्वचा रोग तज्ञ डॉ. स्वाती गुरव यांनीही त्वचा विकाराबद्दल माहिती दिली.
डॉ. शरद गुरव म्हणाले बर्फ हा आजार पसरवत असतो मात्र खाण्यालायक व इतर कामाला वापरण्यासाठी वेगळा बर्फ ठेवण्याची पद्धत आपकयाकडे नाही अन्न व औषध विभागाने यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.डॉ. स्वाती गुरव यांनी तरुण पिढी अलीकडे टेटू काढू लागली असून हे प्रमाण वाढत आहे यामुळे त्वचा विकार होण्याची भीती असून प्रशिक्षित शिक्षण घेतलेल्या लोकांकडून ते काढून देण्याचा सल्ला त्यांनी दिला कारण एकाच सुईने अनेकांना टॅटू काढला तर त्याने त्वचा विकाराची शक्यता असते मात्र हा प्रश्न वैयक्तिक असून काळजी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले इसब नागीण ,शिबे ,पांढरे चट्टे ,मुरूम आदि त्वचा विकार आरोग्य नीट न राखल्याने ,ओले कपडे परिधान केल्याने होतात असे सांगून पावसाळ्यात जुलाब ,डायरिया ,आदी आजार होतात म्हणून पाणी स्वच्छ व उकळून प्यावे असे आवाहन केले
Please follow and like us: