खाकीचे भय उरले नाही पोलीस स्थानकात दोन मद्यपींचा राडा…
डोंबिवली दि. ०६ – सोसायटीच्या झालेल्या वादातून तक्रारी साठी दोन गट महात्मा पोलीस स्थानकात गेले दोघांचे म्हणने एकूण पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी दखल केल्या, मात्र या दोन गटात पोलीस स्थानकातच वाद झाला याचा वादातून दोघा जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत राडा केला दोघा जणांनी चक्क पोलीस स्थानकाच्या बाहेर ठेवलेल्या कुंड्यांची तोड फोड केली इतकेच नव्हे तर पोलीस स्थानकाच्या खिडकीच्या काचा फोडत एकच गोंधळ घातला. पोलीस स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली पोलिसांनी तोडफोड करणारे राडेबाज भाऊ बादशाह यशवद व रावसाहेब यशवद या दोघांना अटक केली.
कल्याण पश्चिमेकडील म्हाडा कॉलनी येथे राहणारे भाऊ बादशाह यशवद व रावसाहेब यशवद या दोघांनी राहत्या सोसायटीचा कट्टा तोडल्याने काल संध्याकाळी सोसायटीच्या सदस्यांनी त्यांना जाब विचारला यावेळी या दोघा भावांनी मद्य प्राशन केले होते त्यामुळे संतापेल्या या दोघा भावांनी त्याच्याशी हुज्जत घातली. हे दोन्ही गत महात्मा फुले पोलीस स्थानकात गेले व एकेकांविरोधात तक्रारी दखल केल्या. पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारी केल्या मात्र दारूच्या नशेत असलेल्या भाऊ बादशाह यशवद व रावसाहेब यशवद या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली इतकेच नव्हे तर त्यांनी पोलीस स्थानकाच्या बाहेर ठेवलेल्या कुंड्यांची नासधूस केली त्यानंतर पोलीस स्थानकाच्या खिडकीच्या काचा फोडल्या व शिवीगाळ करत या दोघांनी पोलीस स्थानकात एकच गोंधळ घातला. पोलिसांनी या दोन्ही राडेबाज भावाना अटक केली आहे