खड्ड्यात पाच बळी गेले मात्र महासभेत चर्चा झालीच नाही राजदंड पळविल्याने सभा तहकूब

(बाळकृष्ण मोरे )

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत मंगळवारी रस्त्याच्या खड्यात पाच बळी गेल्या मुळे मोठी वादळी चर्चा होईल असे बोलले जात होते. पण राजदंड पळविला गेल्याने ही चर्चा होऊच शकली नाही. या पूर्वी भाजपाच्या महिला नगरसेविकानी समोरच्या मोकळ्या जागेत बसून प्रशासनाचा निषेध करीत घोषणाबाजी केली. तर अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी रस्त्याच्या खड्यामूळे बळी गेलेल्याना श्रद्धांजली वाहण्याची मागणी केली. ही श्रद्धांजली वाहण्यात आल्यावर गोंधळ सुरू झाला आणि या गोंधळात मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी राजदंड पळविला, या नंतर महापौर विनिता राणे यांनी सभा तहकूब केली. त्या मुळे रस्त्यातील खड्याच्या मुळे महापालिका क्षेत्रात बळी जात असताना या विषयावर चर्चा होऊच शकली नाही.

सभेच्या पूर्वी अपक्ष नगरसेवक मातीत माखून आलेल्या अपक्ष नगरसेवक कासिफ यांना सुरक्षारक्षकांनी लिफ्टच्या दरवाजवरच रोखून धरले होते. या वेळी त्यांची सुरक्षारक्षकांन बरोबर बाचाबाची झाली.” आपल्याला हात लावू नका म्हणून कासिफ तानकी सुरक्षा रक्षकांना सांगत होते. माझ्या प्रभागात खड्डे भरण्याचे काम सुरू असून येथे फक्त माती टाकून खड्डे भरले जात आहेत.तेथे खड्डे भरताना उभा राहून काम बघत होतो पण सभेचा वेळ झाल्याने शेवटी कपडे न बदलातच महासभेस आलो” या नंतर ताणकी यांनी कसाबसा लिफ्ट मध्य प्रवेश करून महासभेत जाण्या साठी ते चौथ्या माजल्या वर आले पण तेथेही त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले शेवटी नगरसेविका शालिनी वायले व इतर काही महिला नगसेविका तानकी यांना महासभेत प्रवेश मिळवून दिला.

सभा सुरू झाल्यावर मनसेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनी रस्त्यांच्या खड्ड्या बाबत बोलण्याचा प्रयत्न केला पण ताणकी यांनी खड्ड्यात बळी पडलेल्याना श्रद्धांजली वाहण्याची मागणी केली. या श्रद्धांजली वाहण्याच्या नंतर मनसेच्या प्रकाश भोईर यांनी राजदंड पळविल्याने सभा तहकूब करण्यात आली. आता या रस्त्याच्या खड्ड्याचा विषय पुढील महासभेत घेतला जाईल.

मंगळवारी तहकूब झालेल्या सभे बाबत शिवसेना गटनेते दशरथ धाडीगावकर यांनी आरोप केला की आज अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव होता ,त्या प्रस्तावाला बगल देण्या साठी भाजपा नगरसेवकानी या भ्रष्ट्र अधिकाऱ्यांचे निलंबन होऊ नये म्हणून हेतुपुरस्सर सभागृहाचे काम होऊ दिले नाही.हा जबाबदारीतून पळण्याचा प्रयत्न असून आपण याचा निषेध करीत आहोत.

या सभेत भाजपच्या उपमहापौर असलेल्या उपेक्ष भोईर यांनी जवाबदार असलेल्या प्रशाकीय यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लक्षवेधी मांडली होती तसेच प्रशासनाच्या नाकर्तेपनाचा निषेध म्हणून आपण उपमहापौरांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे त्यांनी जाहिर केले होते.
पण महासभा तहकुब झाल्याने त्यांची लक्षवेधी पटलावर घेण्यात आली नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email