क.डों.म.पा.च्या ढिसाळ कामगिरीमुळे कचरा समस्येत वाढ,राजेश मोरे यांचा आंदोलनाचा इशारा
डोंबिवली – आठवडाभरापासून डोंबिवलीत कच-याची समस्या वाढलेली आहे. त्यामुळे अस्वच्छतेचा कलंक पुसायचा तरी कसा असा सवाल करत सभागृह नेते राजेश मोरेंनी खंबाळपाडा वाहनतळामध्ये अधिका-यांच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली.
त्यावेळी स्वच्छता विभागाच दुर्लक्ष आणि वाहनांची देखभाल दुरुस्ति करणा-या ठेकेदाराच्या ढिसाळ कामामुळे समस्येत वाढ होत असल्याचे त्यांच्या नीदर्शनास आले आहे
खंबाळपाडा येथिल जागेमध्ये कच-याच्या आरसी गाडया, घंटागाड्या उभ्या केल्या जातात, तेथेच वाहनांची देखभाल केली जाते. चार आरसी गाड्यांचे काम सुरु असून एक गाडी तर महिनाभरापासून केवळ पाटा बसवण्यासाठी उभी आहे. तर ११ गाड्या तांत्रिक कारणांमुळे उभ्या आहेत. विशेष म्हणजे शास्त्रीनगर मधील रुग्णवाहिका २० दिवसांपासून डेपोत पडून आहे.
रुग्णवाहिकेची चाकं बदलण्यासाठी आणले होते मात्र २० दिवस होऊनही चाकं बदलेली नसल्याचे या पाहणी दौऱ्यात उघड झाले.
गाडीचे चालक चाव्या घरी घेऊन जातात ही बाब आजच्या दोऱ्यात समोर आली. सभागृह नेता राजेश मोरे आणि माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांनी अचानक पाहणी दौरा केल्यामुळे वास्तव उघडकीस आले.
या सर्व प्रकाराबाबत राजेश मोरे यांनी चौकशी करायची मागणी केली आहे. जर आयुक्तांनी लक्ष दिले नाही तर आंदोलन करू असा इशाराही दिला आहे