क्षुल्लक कारणावरून सेक्रेटरीने केला वॉचमनचा खून
उल्हासनगर – उल्हासनगर कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील मेनका पॅलेस या इमारतीत साफसफाईच्या क्षुल्लक कारणावरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून विकास सोनार आणि त्याचे कुटुंब हे मेनका पॅलेस येथे वॉचमनचे काम करत होते. सोमवारी इमारतीची साफसफाई का केली नाही, असा प्रश्न इमारतीचा सेक्रटरी विक्की तलरेजा यांनी विकास सोनार यांना केला. आजारी असल्याने साफसफाई केली नाही, आता करतो असे वॉचमनने सांगितले. विक्की याने रागाच्या भरात वॉचमनला मारहाण केली आणि तो निघून गेला. खाली निपचित पडलेल्या वॉचमनला पत्नी अनिता हिने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी इमारतीचा सेक्रटरी विक्की तलरेजा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत बजरंग दल व शिव प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी गोमांंसाने भरलेला ट्रक पकडला