कल्याण – कल्याण पूर्वेकडील वालधुनी येथे राहणारा संदेश निकम यांचे रुक्मिणीबाई रुग्णालय समोर दुकानं असून काल दुपारच्या सुमारस दीपक घाडगे हा तरुण त्यांच्या दुकानात आला त्याने संदेश कडे 10 हजार रुपये मागितले मात्र संदेशने पैसे देण्यास नकार दिला असता त्याने संदेशला चाकू दाखवत धमकी दिली या प्रकरणी संदेश याने महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दीपक विरोधात गुन्हा दखल केला आहे .तर दिपक घाडगे याने हि संदेश निकम व रोहित याने दीपककडे रागाने बघितले त्यामुळे दिनेश ने संदेशला रागने का बघतोस असा विचारले असता संदेश आणि रोहित ने दीपकला ठोशा बुक्क्यांनी व बांबूने मारहाण केल्याचा आरोप करत महत्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी संदेश निकम व रोहित विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.