क्षुल्लक करणावरून मारहाण व इमारतीत घुसून केली तोडफोड
कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील नेरुरकर पथ दिलीप निवास येथे राहणारे चंदन भगत हे केबल व्यासायिक असून ते त्याचे मित्र निलेश द्वे व सत्यम यांच्या सोबत रविवारी रात्री सागर हॉटेल मध्ये बसले होते .साडे बारा वाजण्याच्या सुमारास कुमार आवटे ,पवन केने ,दीपक ठाकरे अभिनय शिंदे या ठिकाणी आले त्यांनी भगत यांना तुम्हाला मस्ती आली आहे का असे बोलत शिवीगाळ करत मारहाण केली व तेथून निघून गेले त्यानंतर भगत यांच्या इमारती मध्ये जावून तोडफोड केली .या प्रकरणी भगत यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी कुमार आवटे ,पवन केने ,दीपक ठाकरे अभिनय शिंदे विरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: