क्रेडीट कार्डवर ओनलाईन च्या आधारे ९२ हजार ५०० रुपयांचा गंडा
कल्याण – फोनवर विविध भूलथापा देत डेबिट अथवा क्रेडीट कार्डची माहिती मिळवून त्या आधारे ऑनलाईण च्या आधारे कार्ड मधून लाखोंची खरेदी करण्याचे प्रकार वाढले असून या वाढत्या तक्रारीमुळे पोलीस यंत्रणा हि चक्रावल्या आहेत .बँक व पोलिसांकडून हि कुणालाही फोन वर किंवा प्रत्यक्ष कार्ड बद्दल माहिटी देवू नका याबाबत मोठ्या प्रमाणात जनजगृती करण्यात आली मात्र आजहि अनेक प्रकार घडत आहेत .अशीच एक घटना कल्याणात उघडकीस आली आहे .कल्याण पश्चिम अहिल्याबाई चौक येथे निशिगंध अपार्ट मेंट मध्ये राहणारे विद्याधर मदन ५५ यांना गत महिन्यात मोबाईल दोन अज्ञात इसम व एका महिलेने विविध मोबाईल क्रमांकावरून केले .त्यांनी तुमच्या कार्डचे पोइंटस कॅश मध्ये रिडिम करण्याचे आमिष दाखवून बोलण्यात गुंतवून कार्ड ची माहिती जाणून घेत त्यांच्या कार्ड मधून ओनलाईन च्या माध्यमातून तब्बल ९२ हजार ५०० रुपयांची खरेदी केली सदर बाब मदन यांच्या निदर्शनास येतच त्यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे