कोळसेवाडी पोलीस स्थानकाच्या विभाजनाची मागणी
डोंबिवली – कल्याण पूर्वे परिसरात गेल्या वर्षभरापासून गुन्हे गारी प्रवृत्ती वाढीस लागली असून या गुन्हे गारांना पोलिसांचे भय उरलेच नसल्याचे दिसून येत आहे .गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ्ज घडणाऱ्या घटना मुळे पोलीस यंत्रणेवर सवाल उपस्थित झाले असून या भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे .या परिसरात स्वतंत्र पोलीस स्थानकाची मागणी केल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे मात्र पोलीस ,पालिका लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
कल्याण पूर्व परिसरात दिवसा गणिक लोकवस्ती वाढत असून या वाढत्या लोकवस्तीमुळे कल्याण मधील गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत असतांना आकडेवारी वरून दिसून येत आहे . चोरी घरफोडी च्या प्रमाणात तर लक्षणीय वाढ झाली असून आधी फक्त रात्रीच्या चोऱ्या होत होत्या. मात्र आता तर दिवसा ढवळ्याही घरांना लक्ष केले जात आहे. खून, हाणामाऱ्या, महिलांचे मंगळसूत्र खेचणे, पाकीटमारी, महिलांची छेडछाड, दिवसाढवळ्या नागरी वस्त्यांत घुसून हातात धारधार शस्त्रे घेऊन दहशत पसरविणे, गाड्या चोरणे, जुगाराचे अड्डे, गावठी दारूचे गुत्ते, शाळा परिसरात आणि नागरी वस्त्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणे, घरफोड्या, दुकानांचे शटर तोडून चोऱ्या आदी गुन्ह्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.तीन दिवसांपूर्वी तिसगाव परिसरात धक्का लागल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला ,कोलशे वाडी बोगद्यात चोरीच्या उद्देशाने करण्यात आलेली हत्या या घटनेने या भागातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील पोलीस स्थानक काही वर्षा पूर्वी विठ्ठलवाडी मध्ये हलविण्यात आले आहे. श्हारच्या मध्यभागी असलेले पोलीस स्थानक एका टोकाला नेवून ठेवणे.पोलीस स्थानकाची विस्तारलेली हद्द ,अपुरे मनुष्यबळ , देखील गुन्हेगाराच्या पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. कल्याण कोलशे वाडी पोलीस स्थानकाची हद्द चक्कीनाका, नांदिवली, चिंचपाडा, दुर्गानगर, हनुमाननगर, कैलासनगर, शनीनग र, खडेगोळवली, श्रीराम टॉकीज, विठ्ठलवाडी, आनंदवाडी, गणेशवाडी, कोळसेवाडी, देवळेकर वाडी, करपेवाडी, मंगलराघो नगर, तिसगाव, लोकग्राम, विजयनगर, शिवाजी कॉलनी, जगतापवाडी, लक्ष्मीबाग, काटेमानिवली, नेतिवली, जाईबाई विद्यामंदिर, आमराई, गवळीनगर, मेट्रो मॉल पर्यंत आहे.मात्र संपूर्ण हद्दीत पोलिसांच्या गस्ती चर्चेचा विषय बनला आहे पोलीस स्थानकातून गस्ती साठी निघालेले पथक गस्ती घालतात कुठे हा संशेधनाच विषय बनला आहे . पोलिसांचे गस्ती पथक एक तर मलंग रोड वरील बारच्या बाहेर किंवा गल्ली कोपर्यातील चायनीज च्या बाहेर उभे असल्याचे दिसून येते . वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोलशेवाडी पोलीस स्थानकाची हद्द पाहता गेल्या अनेक वर्षपासून या पोलीस स्थानकाचे विभाजन करत कोळसेवाडीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे पुरविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पाठपुरावा केला मात्र या मागणीबाबत पोलीस तसेच पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे .याबाबत नितीन निकम यांनी गणेशवाडी प्रभागात सांकृतिक भवनासाठी आरक्षण शक्तीधाम संकुल येथे आहे. तेथील जागेमध्ये खासगी विकासक महापालिकेला इमारत काही अटींवर बांधून देत आहे. इमारत जवळपास पूर्ण होत आलेली आहे. काहीजणांना या जागेचा वापर लग्नाचे सभागृह म्हणून करायचा आहे. मात्र इथे पोलीस ठाणे झाल्यास त्याचा उपयोग नागरिकांना होऊ शकेल. इथे पोलीस ठाणे झाल्यास नागरिकांचा प्रश्न सुटू शकेल. त्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनानेही प्रयत्न करण्याची गरज आहे. या मागणीसाठी आम्ही स्वाक्षरी मोहीमही राबवली होती. त्याला लाखो नागरिकांनी पाठींबा दिला होता. परंतु प्रशासन आणि नेत्यांच्या उदासीनतेमुळे हि मागणी दुर्लक्षित आहे असे सांगितले