कोपर स्टेशन मुंबई दिशेला पादचारी पूल तात्काळ बांधा,मनसे सरचिटणीस प्रमोद पाटील यांच्या डोंबिवली रेल्वे प्रबंधक यांची भेट
( श्रीराम कांदु )
कोपर स्टेशन हे मध्य रेल्वे चे नविन रेल्वे स्टेशन जरी असले तरी सदर स्टेशनवर जाण्या येण्या साठी एकच पादचारी पूल असून तो डोंबिवली दिशेला आहे, त्यामुळे कोपर पश्चिम येथील, आयरे,भोपर ह्या नव्याने वाढलेल्या लोकवस्तीतील प्रवाश्यांना डोंबिवली दिशेच्या पूलावरून कोपर स्टेशनला यायला मोठा वळसा मारून यावे लागते, त्यामुळे वेळ देखिल वाया जातो, अश्या वेळी घाई गडबडीत प्रवासी रेल्वे ट्रॅक ओलांडून कोपर स्टेशन गाठण्याचा प्रयत्न होतो, त्यामुळे कोपर रेल्वे क्राॅसींग करतानाच्या अपघातात अनेक प्रवाश्यांचे बळी गेले आहेत व हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे..
वारंवार तक्रार करून सुध्दा जर रेल्वे प्रशासन नविन पूल बांधण्याबाबत दुर्लक्ष करत असेल तर मनसे ला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, तरी लवकरात लवकर कोपर स्टेशन मुंबई दिशेला नविन पादचारी पूलाला मंजूरी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
सदर प्रसंगी मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत,मनसे गटनेते प्रकाश भोईर,विभागअध्यक्ष दिपक शिंदे,सुभाष कदम,रविंद्र गरुड,विजय शिंदे उपस्थित होते.