कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही

ठाणे- कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही असे उपनियंत्रक शिधावाटप नरेश वंजारी यांनी स्पष्ट केले आहे. फ परिमंडळ क्षेत्रात ८० टक्के आधार जोडणी झाली असून शिधावाटप पत्रिकेतील कोणत्याही एका सदस्याचे आधार पडताळणी झाली तरी धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.

या क्षेत्रात १२ एप्रिल पर्यंत पोर्टेबिलिटीद्वारे २ हजार ६३४ व्यवहार झाले असून कमीत कमी एक सदस्याची आधार पडताळणी झाली आहे अशा शिधापत्रिकांची संख्या ८० .६७ टक्के आहे. रोज २५ हजारापेक्षा जास्त लाभार्थी धान्य उचल करीत आहेत.

आधार पडताळणी झाली नसली तरी ई केवायसी करूनही धान्य वितरण केले जाईल. आत्तपर्यंत ६६०२ लाभार्थीचे ई केवायसी झाले असून ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email