केडीएमसीच्या अंदाज पत्रकात ५0 लाख रुपये पत्रकार आपत्कालीन निधीची तरतूद

 ५0 लाख रुपये पत्रकार आपत्कालीन निधीची तरतूद

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २०१८ – १९ च्या अंदाज पत्रकात यंदा प्रथमच पत्रकार आपत्कालीन निधी म्हणून रुपये ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .या निधीचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा, यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे .

 मुंबई व ठाणे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद 

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे .आपले काम करताना त्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते . अनेकदा दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते .कधी अपघातात अपंगत्व येते तर कधी जीवाला मुकावे लागते . आधीच पत्रकारांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असते ,त्यातच अशाप्रकारचे संकट ओढावते , त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांची खूप ओढाताण होत असते .मुंबई व ठाणे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना वा त्यांच्या कुटुंबियांना या संकट काळात मदत करता यावी , म्हणून ५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे .

 कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २०१८ – १९ च्या अंदाज पत्रकातही  ५0 लाख रुपये पत्रकार आपत्कालीन निधीची तरतूद

त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने सुद्धा यंदाच्या अंदाज पत्रकात विशेष तरतूद करावी , अशी मागणी कल्याण डोंबिवली पत्रकार संघाच्या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल दामले,विरोधी पक्षनेता मंदार हळबे, सभागृह नेता राजेश मोरे व पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे एक निवेदन देऊन केली होती . या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत अखेर अंदाज पत्रकात पत्रकार आपत्कालीन निधी या नवीन लेखा शिर्षकाअंतर्गत प्रथमच रुपये ५० लाख तरतूद केली आहे .या निधीचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा, यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे .पत्रकारांसाठी अशा प्रकारे अंदाज पत्रकात तरतूद करून पत्रकारांना दिलासा दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली पत्रकार संघाने स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांचे विशेष आभार व्यक्त केले.दरम्यान सदर निर्णयाबद्दल कल्याण डोंबीवलीतील पत्रकारांनीही समाधान व्यक्त करत पालिकेचे आभार मानले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email