केडीएमटी च्या धडकेत इसामचा मृत्यू

डोंबिवली  –  केडीएमटी बस च्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटन कल्याण पश्चिम येथील एसटी डेपो परिसरात घडली आहे विजय रणशूर असे या मयत इसमाचे नाव असून या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात केडीएमटि चालक संतोष पवार विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

    विजय रणशूर नावाचा इसम सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कल्याण एसटी डेपो जवळील कल्याण दरबार हॉटेल समोरून पायी चालत असताना केडीएमटी बस क्रमांक एम एच ०५ ११८७ क्रमांकच्या बसने त्याला धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात बस चालक संतोष पवार विरोधात हयगयीने निष्काळजीपणाने व बेदरकारपणे व भरधाव वेगात त्यांचे ताब्यातील बस चालवून विजय यांचा अपघात करून त्यास गंभीर दुखापत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे .दरम्यान या आधी केडीएमटी च्या बस चालकाकडून अशा प्रकारे अपघाताच्या अनेक घटना घडल्या असूनअशा चालका विरोधात पालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email