केडीएमटीचे उत्पन्न घटले , दांडीबहाद्दरांना नोटीसा

१५ वाहनचालक निलंबित

 डोंबिवली – कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत  असताना यात वाहनचालक – वाहक यांनी भर दिल्याचे समोर आले आहे.एप्रिल महिन्यात परवानगी न घेता  वाहनचालक – वाहक  दांडी मारल्याने या महिन्यात उत्पन्नात सुमारे १ लाख रुपयांची घट झाली. अश्या खवा नोटीसा बजावण्यात आल्या असून १५ ते २० वाहनचालकांना निलंबित करण्यात आले आहे. परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी ही करवाई केली असून परिवहन समिती सदस्यांनी सदर योग्य कारवाई असल्याचे सांगितले.

     परिवहन उपक्रमात ३१९ वाहक आणि २८५ वाहनचालक आहेत. प्रत्येक महिन्यात सुमारे साडे पाच रुपये इतके उत्पन्न मिळत असताना एप्रिल महिन्यात चार ते साडेचार लाख उत्पन्न मिळत असल्याची माहिती संतोष चव्हाण यांनी सांगितले. याबाबत चव्हाण यांनी टेकाळे यांना विचारला. या संदर्भात टेकाळे यांनी चौकशी केली असता कर्मचारी परवानगी न घेता दांडी मारत असल्याची वास्तविकता समोर आली. या प्रकारावर आळा बसावा याकरिता ८७ कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून १५ ते २० वाहनचालकांना निलंबित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे. प्रभारी आभार व्यवस्थापक संदीप भोसले आणि वाहतुक निरीक्षकास कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आली आहे. २४ तासात खुलासा न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याबाबत टेकाळे यांना विचारले असता ते म्हणाले,एप्रिल महिन्यात काही कर्मचारी हजेरी लावत नसल्याने रस्त्यावर फार कमी बसेस धावतात. याचा उत्पनावर परिणाम होत असल्याने सदर कारवाई करण्यात आली. दरवर्षी एप्रिल महिन्यातच जास्त प्रमाणात वाहनचालक दांडी मारतात. त्यामुळे त्यांना नोटीसा बजावल्या जातात. तर परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी सदर कारवाई योग्य असल्याचे सांगितले. संजय राणे यांनी परिवहन सेवेतील वाहनचालक त्यांच्या  फायद्यासाठी परवानगी न घेता दांडी मारतात. एप्रिल महिन्यात खाजगी गाडीवर दिवसाला कमीत कमीत ८०० रुपये मिळत असल्याने असे प्रकार वाढत चालले आहेत. परिवहनच्या अधिकाऱ्यांनी वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांना डोक्यावर बसवल्याने आणि अनेक राजकीय परिवहनच्या युनियनने अश्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिल्याने कर्मचारी बिनदास्त दांड्या मारतात.

कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास परिवहन सेवा बंद पडण्याचा युनियनचा इशारा

  परिवहन उपक्रमात काम करणाऱ्या वाहनचालकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिले जात नाही. मग त्यांनी घर आणि संसार कसा चालवायचा याची काळजी परिवहन व्यवस्थापक टेकाळे आणि सदस्यांनी नाही. कर्मचाऱ्यांवर एक बोट दाखविताना सदस्यांकडे चार बोटे असतात हे त्यांनी लक्षात ठेवावे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास परिवहन मजदूर युनियन परिवहन सेवा बंद पाडेल असा इशारा युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिला आहे.

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे उत्पन्नात १ लाख रुपयांची घट 

  परिवहन उपक्रमात २१८ बसेस असून ३१९ वाहक आणि २८५ वाहनचालक आहेत. मात्र प्रत्यक्षात ७० ते ८० बसेस रस्त्यावर धावतात. एप्रिल महिन्यात दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांमुळे ५० ते ६० बसेस धावतात. या महिन्यात परिवहन सेवेचे  उत्पन्नात १ लाख रुपयांची घट झाली आहे. याबद्दल अनेक वेळेला परिवहन समितीत सदस्यांनी आवाज उठविला होता.

Please follow and like us:
Pin Share

Hits: 26

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email