केडीएमटीचा भंगार कारभार चव्हाट्यावर, भरधाव बसचे चाक निखळले रस्त्यावर

(म.विजय)

कल्याण- केडीएमटीच्या चालत्या बसचे चाक अचानक निखळून पडल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेनंतर केडीएमटीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

       बेलापूर मार्गे डोंबिवलीच्या दिशेने येणाऱ्या बसचा अचानक मागचा टायर निखळून पडला. यावेळी बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. मात्र चालकाच्या सावधगिरीने मोठा अपघात टळला आहे.

      या घटनेने केडीएमटीच्या परिवहनचा हलगर्जीपणा समोर आला आहे. केडीएमटीच्या बस गाड्या नेहमीच बंद पडत असतात. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे या घडलेल्या अपघातानंतर उघड झाले आहे. चाक निखळल्याचे लक्षात येताच या बसमधील प्रवाशांनी गलका केला. चालकाने प्रसंगावधान राखून बस जागीच थांबविल्याने बसमधून प्रवास करणारे प्रवासी बचावले. बस चालक व वाहकांनी या बसमधील प्रवाशांना अन्य बसमधून स्टेशनकडे पाठविण्याची व्यवस्था केली.

     यापूर्वीही अनेक वेळा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात असंख्य घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यामुळे घोटाळ्याचे माहेरघर अशी उपाधी विरोधकांनी दिली असल्याने पुन्हा एकदा केडीएमटीचा गलथान कारभार समोर आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email