केंद्र आणि राज्य संघटनांची 26वी परिषद
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 15 आणि 16 नोव्हेंबर 2018 रोजी हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे केंद्र आणि राज्य संघटनांची 26 वी परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री विजय गोयल 15 नोव्हेंबरला या परिषदेचे उद्घाटन करतील. ‘सरकारी सांख्यिकीत दर्जाची हमी’ ही यावर्षीची संकल्पना आहे. केंद्रीय आणि राज्य सांख्यिकी संस्थांमधील समन्वयासाठी ही परिषद प्रमुख राष्ट्रीय मंच आहे. संकल्पनेवर आधारित विविध दस्तावेज या परिषदेत सादर केले जातील.
Please follow and like us: