कार व दुचाकीच्या अपघातात तिन जण ठार पाच जण गंभीर

कार व दुचाकीच्या धडकेत तिघे जण जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना कळंब-राळेगाव मार्गावरील कात्री गावाजवळ घडली. त्यात कारमधील एक जण व दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरुद्ध मार्गाने भरधाव वेगात येत असलेल्या कारने दुचाकीला  धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील चारही जण रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्याने जखमी झाले. या अपघातादरम्यान कार चालकाचे नियंत्रण सुटले भरधाव वेगात असलेली कार रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. यात कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील विनोद कवडू वड्डे, गोपाळ ज्ञानेश्वर जुनघरे व मोहन मेश्राम हे जागीच ठार झाले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email