कांशीराम व बहनजींच्या त्यागाला रुपेरी कडा प्राप्त करुन देणार ; बसपा प्रदेश सचिव दयानंद किरतकर
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – बहनजी मायावती यांनी सुरेश साखरे यांना राज्याचे अध्यक्ष पद बहाल केले हा निर्णय योग्य आहे. त्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साखरे यांनी आळखले आहे की, जयभीमवाला घाबरणार नाही. त्याच्या रक्तामध्ये ध्येय आहे. तो ध्येय मिळविल्याशिवाय राहणार नाही. कल्याण डोंबिवलीतून आमदार खासदार निवडून आणणार आणि कांशीराम , बहनजींच्या व बहुजन समाजाच्या त्यागाला रुपेरी कडा प्राप्त करुन देणार असल्याचा ठाम निर्धार बसपा प्रदेश सचिव दयानंद किरतकर कल्याणात यांनी व्यक्त केला.
साखरेंमुळे आमच्या रक्तात एक प्रकारे चैतन्य आलेले आहे.ते कालपर्यंत सोनारासारखे काम करीत होतो. आता लोहारासारखे काम करणार आहोत. राज्यात जयभिमवाल्यामधला जोम साखरे यांनी ओळखला आहे.बसपाचा झंझावात साखरच्या दौऱ्या मुळे निर्माण झाला. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल. बसपाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून जातील.बहुजन समाजाने पक्षाला योगदान दिले ते साखरे यांच्या नेतृत्वाखाली फळाला आलेले दिसले. बहनजी मायावती यांनी सुरेश साखरे यांना राज्याचे अध्यक्ष पद बहाल केले हा निर्णय योग्य आहे. त्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. साखरे यांनी ओळखले आहे की, जयभीमवाला घाबरणार नाही. त्याच्या रक्तामध्ये ध्येय आहे. तो ध्येय मिळविल्याशिवाय राहणार नाही. कल्याण डोंबिवलीतून आमदार खासदार निवडून आणणार आणि कांशीराम , बहनजींच्या व बहुजन समाजाच्या त्यागाला रुपेरी कडा प्राप्त करुन देणार असल्याचा ठाम निर्धार बसपा प्रदेश सचिव दयानंद किरतकर यांनी व्यक्त केला.