कांदा व्यापाऱ्याला ५७ लाखांचा चुना
चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
(म.विजय)
नगर – नगरच्या कांदा व्यापाऱ्याची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात कोल्हापूर येथील चौघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर येथील कांदा व्यापारी अशोक बापूसाहेब लाटे (वय ५९, रा. भूषणनगर, केडगाव, नगर) यांना कोल्हापूर येथील नितीन गोविंदराव पाटील (रा. शिरगाव, राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) याच्यासह तिघा जणांनी ४०० टन कांदा विकत देतो असे सांगून लाटे यांच्याकडून ऑगस्ट २०१५ ते आजपावेतो १ कोटी ६ लाख ९० हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे स्विकारली.मात्र पाटील याने श्री. लाटे यांच्यासोबत झालेल्या कराराप्रमाणे पूर्ण माल न देता त्यांचे उर्वरित ५७ लाख ७० हजार ५८० रुपयांची फसवणूक केली.
Please follow and like us: