कांगडा इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या दिक्षान्त समारंभाला राष्ट्रपतींनी केले संबोधित
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या कांगडा इथल्या डॉ. राजेंद्र प्रसाद सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या दीक्षान्त समारंभाला संबोधित केले. परिणामकारक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी अधिक संख्येने चांगले डॉक्टर्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांची गरज असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी बोलतांना सांगितले. उत्तम वैद्यकीय संस्थांना चालना देण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणापुढे आव्हान पेलण्यासाठी, भारतीय वैद्यकीय परिषद (सुधारणा) अध्यादेश 2018 जारी करण्यात आल्याचे ते म्हणाले. यामुळे वैद्यकीय महाविद्यालय आणि संस्था स्थापण्याला, या संस्थाच्या विस्ताराला आणि आधुनिकीकरणाला चालना मिळेल असे राष्ट्रपती म्हणाले.
Please follow and like us: