कळवा रहिवासी भागात देहविक्रय करणा-यांवर कारवाई

कळवा – ठाण्याच्या अँटी ह्यूमन ट्रैफिकिंग सेलने ठाण्याला लागून कळवा रहिवासी इमारती मधून देहविक्रय करणाऱ्या तीन महिलाना अटक केली  आहे. ठाणे एएचटीसी क्राइम यूनिटचे प्रमुख रविंद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या छापेमारी मध्ये पोलिसाना दोन अल्पवयीन मुली पण सापडल्या.अँटी ह्यूमन ट्रैफिकिंग सेलचे प्रमुख रविन्द्र दौंडकर यांनां प्राप्त गुप्त सूचनेनुसार कळवा येथील चंद्रशेखर अपार्टमेंट मध्ये बेकायदेशीर पणे देहविक्रय केला जात असल्याची माहिती मिळाली होती.या नुसार  सांयकाळी ३:०० वाजता टाकलेल्या छाप्यात त्या घरातुन ३ महिलाना अटक करण्यात आली तर चार जणींची सुटका करण्यात आली ज्यात दोन अल्पवयीन मुली असून एक १६ वर्षीय आणि दुसरी की १७ वर्षीय असल्याचे सागंण्यात येते. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email