कल्याण स्कायवॉक दारूड्यांची तरुणाला बेदम मारहाण
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.०७ – कल्याण स्काय वाक वर एका तरुणाला हटकत तीन दारुड्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना रात्री साडे दहा च्या सुमारास घडली या घटनेमुळे कल्याण च्या स्काय वॉक वरील सुरक्षिततेच प्रश्न एरनिवर आला आहे .
कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात कस्तुरीग्राम सोसायटी मध्ये राहणारे आशिष जैन हे काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक लगतच्या स्काय वॉक वरून पायी चालत असताना तीन मद्य पीनी त्यांना हटकले यावेळी जैन याने त्यांना मला जावू द्या असे सांगितल्याने संतापेल्या या तिघा मद्यपीनि त्याला शिवीगाळ करत त्याच्याशी वाद घालत मारहाण केली .या प्रकरणी जैन यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी तिघा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे. तर या घटनेमुळे या स्काय वॉक वर दारुडे गर्दुल्ले यांचा वावर व त्याच्याकडून पादचार्यांना होणार जाच पुन्हा एकदा समोर आल्याने या स्काय वॉक वर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.