कल्याण शिळ रोड येथून गावठी रिव्हॉलवर व ८ जिवंत काडतुसांसह एकला अटक
(म.विजय)
कल्याण – शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे यांना एक इसम हत्यारासह शुभम लॉज विभागात येणार असल्याची खबर गुप्त बातमिदारामार्फत मिळाली होती यानुसार पोलिसांनी कल्याण शिळ रोड येथील शुभम लॉज समोरच्या रस्त्यावर सापळा रचून अमरलाल हरिलाल कनोजिया याला गावठी रिव्हॉलवर व ८ जिवंत काडतुसे यांसह अटक केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे यांंनी पथक बनवून सदर सापळा रचला व आरोपीला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिल जावळे, स.पो.नि.नितीन पाटील,पोलीस उप निरीक्षक विशाल धायगुड़े तसेच विशाल चव्हाण,पंकज गायकर,अजीज तडवी,ललित वाकडे,श्रीकांत धायगुड़े,धनंजय आहेर,दिपक पवार,महेंद्र बरफ यांनी या कारवाईत भाग घेतला होता.याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून स.पो.नि.नितीन पाटील पुढील तपास पहात आहेत.