कल्याण : शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या इसमाला बेदम मारहाण करत त्याचा गळा आवळून हत्या केल्यची धक्कादायक घटना कल्याण पुर्वेककडील नांदिवली परिसरात घडली आहे .संदेश घडशी असे मयत इसमाचे नाव असून त्याच्या पत्नीने या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विनय ताम्हनकर ,जान्हवी ताम्हनकर ,तुषार आडवीलकर ,नरेंद्र आडवीलकर,निहा आडवीलकर,या पाच जना विरोधात गुन्हा दखल केला आहे .
कल्याण पूर्वेकडील मलंग रोड काका ढाब्याजवळ शिवम हौसिंग सोसायटी चाळीत राहणारे संदेश घडशी काल सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारस चाळीतील एका दुकानात बसले होते यावेळी विनय ताम्हनकर याने त्यांना शिवीगाळ केली .विनाकारण शिवीगाळ करीत असल्याने संदेश यांनी विनय ला जाब विचारला त्यामुळे संतापलेल्या विजय रिक्षातून खाली उतरला त्याने संदेश यांना मारहाण करण्यास सुरुवात करत चाळीत ओढत नेले तेथे विनय याच्या पत्नी जान्हवी ,मेव्हणा नरेंद्र ,त्यांची पत्नी निहा ,नरेंद्र चा भाऊ तुषार यांनी संदेश ला ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली तर नरेंद्र ने संदेश यांचा गळा दाबून छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत संदेश याचा मृत्यू झाला .या प्रकरणी संदेश यांची पत्नीने कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विनय ताम्हनकर ,जान्हवी ताम्हनकर ,तुषार आडवीलकर ,नरेंद्र आडवीलकर,निहा आडवीलकर,या पाच जना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.