कल्याण मध्ये भरदिवसा घरफोडी
कल्याण दि.०१ – कल्याण नजीक असलेल्या मोहने आंबिवली येथील शिवश्रुष्टी कॉम्प्लेकस शिवशंभू सोसायटी मध्ये राहणारे जयेंद्र हांडे काल सकाळी नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामावर निघून गेले याच दरम्यान घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश करत घरातील ३३ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुपारी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Please follow and like us: